Add

ईश्वराची दया किती - उपासना संगीत - गीत नंबर ३३

 


ईश्वराची दया किती (वंदन - ३३)

 

ईश्वराची दया किती ! थांग तीचा लागेना;

न्यायि, तरी त्याची प्रिती सिंधुएवढी जाणा.

ध्रु. देव बोले प्रेमे फार, टांकि माझ्यावरी भार.

 

सर्व कष्टी, सर्व दुःखी ओझियांनी कण्हती;

ऐकू जातें दिव्यलोकी, प्रीती तेथें वसती.

 

देवं खरा ममताळू अंत कांही लागेना;

केवढा तो कनवाळू माणसांना कळेना.

 

ती खरी अगाध प्रीती ती तयाच्या अंतरी;

तोच म्हणे, 'नाही भीती, मी दयासनावारी.

 

या, उदासी, भ्रांति सोडा, त्याचि वाणी ऐकुनी;

निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनीं.

 

बापावरी टेंकतांना लेकरांना सुख फार,

येशुपाशीं राहतांना हर्ष वाटतों अपार.


Song Link - https://youtu.be/6LNTNWD0CIE?si=jyWq6VpYnMnvJ3aL





Post a Comment

0 Comments