Add

माझा येशु मला प्रिय फार





माझा येशु मला प्रिय फार


माझा येशु मला प्रिय फार
ह्या जीवनात तोच आधार
आपत्तीत विपतीत ह्या जीवन यात्रेत
तो कधी ना मला सोडणार -  
 
हा जीवन प्रवास कठीण
येते अनेक प्रतिकूल क्षण. - २ 
दिवसा मेध स्तंभ, रात्री अग्नी स्तंभ,
माझा वाटाडे प्रति दिन. - २
 
तो आधी व अंत आहे
हृदयी आनंदाचा झरा आहे. - २
दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी,
माझा प्रतिदिन भार वाहे. - २
 
माझ्या येशुची अपरम प्रीती
मला नाही कशाची भीती. - २
क्लेश, संकट, मरण, नग्नता उपोषण,
ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. - २
 


Post a Comment

0 Comments