Add

ख्रिस्ती बांधवांचा मेळा - उपासना संगीत - गीत नंबर ७५७



ख्रिस्ती बांधवांचा मेळा

 

ख्रिस्ती बांधवांचा मेळा – २

ख्रिस्ती बांधवांचा, गोड प्रीति मेळा ।

भक्तिभाव भोळा । पाही देवा. पाही देवा रे ।

 ख्रिस्ती बांधवांचा मेळा


आवडे तुला रे, नाद गायनाचा । - २

टाळ मृदुंगाचा । नाही वीट, नाही वीट ।।१।।

 

नाचले तुझे ते, थोर साधुसंत । - २

तुझ्या कीर्तनात । ओढी आम्हां, ओढी आम्हां ।।२।।

 

रंगु दे आम्हांला, रिंगणात गोल । - २

गाऊ दे अमोल, प्रेमगीत, प्रेमगीत ।।३।।

 

गोड गाणी गाता, होऊ पायी लीन । - २

गाऊ या मिळून, देवबापा, देवबापा ।।४।।


Post a Comment

0 Comments