Add

जय जय जगदिशा - उपासना संगीत - गीत नंबर २२

 


जय जय जगदिशा

जय जय जगदीशा! जगाला तुझी मात्र आशा; ।।

जय मंगलधामा ! जगावर तुझा मात्र प्रेमा

जय जगदाधारा! जगाला तुझा मात्र थारा. ।।

जय जय विश्वपते ! जग हे तुझी वाट बघते.

 

(चाल बदलून)

 

तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये, देवा;

तुझे राज्य येवो, जगी या स्वर्ग उभा राहो.

तुलाच वंदन घे। अमुचे वैभव तू अवघे.

तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिनरजनी.

 

प्रभो परात्पर, जय करुणाकर ! | -

जय जय जय बापा !

जय जय जय पुत्रा !

जय जय जय आत्म्या !



Song Link - https://youtu.be/MQsGML9b6ho?si=SX4CRgnQsvIWO9LQ


Post a Comment

0 Comments