परमेश्वराने काही सेवाकांबद्दल आणि त्याच्या पुत्राबद्दल दिलेली अद्भुत साक्ष
आज आपण पवित्र शास्त्रामधील काही लोकांबद्दल परमेश्वर स्वतः काय साक्ष देत आहे. त्याबद्दल आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
परमेश्वराने नोहाबद्दल दिलेली साक्ष -
उत्पत्ती ६ : ९ - ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.
नीतिमान, सात्विक, देवाबरोबर चालणारा –
नीतिमान – पाप न करणारा व्यक्ती
१ पेत्र १ : १५ - १६ - [१५] तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; [१६] कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
सात्विक – सत्यामध्ये चालणारा
नीतिसूत्रे १२ : २२ असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.
३ योहान १ : ४ माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही.
परमेश्वराबरोबर चालणारा – परमेश्वराच्या सह्भागीतेत नेहमी असणारा
परमेश्वर जे सांगेत त्याप्रमाणे करणारा – नोहाने तारू बांधले – लोक निंदा करीत आहेत, त्याची चेष्टा करीत आहेत. पण तो परमेश्वराचे ऐकून त्याप्रमाणे नेहमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
परमेश्वराने मोशेबद्दल दिलेली साक्ष -
गणना १२ : ७ - पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे.
गणना १२ : ८ - मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”
गणना १२ : ३ - मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.
विश्वासू, परमेश्वर त्याच्याशी स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती, सर्व मनुष्यापेक्षा नम्र - विश्वासू – मोशेच्या विश्वासाद्वारे त्याने खूप सारे अध्बुते केली. म्हणून देवाला त्याचा विश्वास
परमेश्वर त्याच्याशी स्पष्ट बोलत असे – प्रत्येक गोष्टींमध्ये परमेश्वर त्याला मार्गदर्शन करीत असे.
नम्रतेचे फायदे -
याकोब ४ : १० - प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.
लूक १४ : ११ - कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
नीतिसूत्रे २९ : २३ - गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.
मत्तय १८ : ४ - ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय;
परमेश्वराने दाविदाबद्दल दिलेली साक्ष -
प्रेषितांची कृत्ये १३ : २२ - नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’
माझ्या मनासारखा मिळाला आहे – Man After My Own Heart
जेव्हा आपण दाविदाबद्दल अभ्यास करतो तेव्हा आपण नेहमी त्याने केलेल्या पापाबद्दल विचार करतो. त्याने व्यभिचाराचे पाप केले, खुनाचे पाप केले. पण त्यानंतर जेव्हा त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली. त्याने खऱ्या अर्थाने पश्चाताप केला आणि त्यानंतर त्याने परमेश्वराचे भय धरून जीवन जगाला.
म्हणून या ठिकाणी स्वतः परमेश्वर साक्ष देत आहे कि, मोशे माझ्या मनासारखा मिळाला आहे. म्हणजेच परमेश्वराला जसा पाहिजे आहे तसा व्यक्ती त्याला मोशेच्या स्वरुपात मिळाला होता. तेव्हा आपण स्वतःबद्दल आपल्या अंतकरणात प्रश्न विचारू कि, मी परमेश्वराला हवा असणारा आहे का ?
हवाहवासा व्यक्ती कधी बनतो ?
अशा व्यक्तीमध्ये सहानुभूती, प्रेमळपणा, मदत करण्याची तयारी आणि चांगली संभाषण कौशल्ये यांसारखी वैशिष्ट्ये आढळतात.
हे सर्व मोशेच्या जीवनात होते -
मोशे प्रेमळ होता – त्याने इस्राएल लोकांवर प्रेम केले.
मोशे मदत करणारा होता – म्हणूनच त्याने इस्राएल लोकांना बंधनातून मुक्त केले.
दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणारा – तो परमेश्वराच्या भावना पण जाणून घेणारा होता आणि लोकांच्या भावना देखील जाणणार होता.
परमेश्वराने त्याचा पुत्र येशुबद्दल दिलेली साक्ष -
मत्तय ३ : १७ - आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
मला परमप्रिय असणारा. आणि ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे –
येशूने यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला आणि जेव्हा तो पाण्यातून बाहेर येत असताना, परमेश्वराची वाणी त्याच्याबद्दल झाली – परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
आपण लोकांच्या दृष्टीने परमप्रिय बनण्यापेक्षा परमेश्वराच्या दृष्टीने परमप्रिय आहोत का ? आपण जगाला, जगातील लोकांना संतुष्ट करीत बसण्यापेक्षा आपला प्रभू कसा संतुष्ट होईल यासाठी प्रयत्नशील असणे जास्त आवश्यक आहे.
- आपण परमेश्वराला संतुष्ट केव्हा बनणार – जेव्हा आपण नेहमी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आणि नेहमी प्रभूला प्राधान्य देऊन आपले जीवन जगणार तेव्हा प्रभू आपल्याबद्दल संतुष्ट होणार.
येशू याप्रमाणे जीवन जगाला म्हणून पिता त्याच्याबद्दल असे उद्गार काढत आहे.
सारांश -
नोहा – नीतिमान व सात्त्विक आणि देवाबरोबर चालनारा.
मोशे – विश्वासू, नम्र, परमेश्वर त्याच्याशी स्पष्टपणे बोलणारा.
दावीद – परमेश्वराच्या मनासारखा.
येशू – परमेश्वराला संतुष्ट करणारा.
यामधून आपल्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, ते आपण पाहूयात, त्यामध्ये वाढ करूयात. आणि जर काही गुणधर्म नसतील तर ते आत्मसाद करून त्याप्रमाणे आपण जीवन जगूया.
God Bless You.
Rev. Pramod Kamble

,lockMovementXfalse,lockMovementYfalse,lockRotationfalse,lockScalingXfalse,lockScalingYfalse,uidc8c6ca61-%20(2).jpg)
0 Comments